You are currently viewing कारगील दिवस

कारगील दिवस

आपले जीवन देऊन, तिरंग्याचा राखला मान |
हातात बंदुक घेऊन, भारत मातेची राखली शान ||
पाकिस्तानी सेनेला केले नेस्तनाबुत, केले त्यांना परास्त ||
कारगिल युद्ध जिंकुन, नवा इतिहास रचला आपल्या भारत देशानं ||
आज दि. २६जुलै २०२२ रोजी ज्ञानदा इंग्लिश स्कुल एन-७ सिडको, औरंगाबाद शाळेमध्ये कारगील दिवस साजरा करण्यात आला. कारगिल दिवसाचे महत्व इतिहास विषयाच्या शिक्षिका स्वप्ना संद्री यांनी सांगितले तर पुर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातुन कारगिल दिवसाची माहिती सांगितली.
अमर ज्योतीचे दृश्य रंगीत कागद व इतर शालेय वस्तुपासुन कला शिक्षिका मोनाली,स्मिता लां. व इतर सहशिक्षिकांनी तयार केले. शाळेच्या माननिय मुख्याध्यापिका नयनतारा नायर मॅम यांनी कारगिल दिवसानिमित्त प्रोत्साहनपर भाषण करुन विद्यार्थ्थांच्या मनात जोशपुर्ण भाव निर्माण केला.शाळेच्या मा. पर्यावेक्षिका वैशाली उगले मॅम यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित, शिस्तबद्ध व छान होण्यासाठी अप्रत्यक्षरित्या खुप सहकार्य केले.
सौ. अनिता सिद्धये मॅम यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक सौ. व श्री. नागेश जोशी सर तसेच सौ. मनिषा जोशी मॅम यांनी अनुमोदन दिले.सरतेशेवटी कारगिल युद्धातील अमर हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहुन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply